इचलकरंजी
अथक परिश्रम आणि चिकाटी ह्या यश मिळवण्याच्या अनिवार्य अटी आहेत, असे प्रतिपादन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. उमेश सुतार आणि प्रा. प्रणव शेटे यांनी केले, येथील जयवंतराव आवळे शिक्षण प्रसारक मंडळ इचलकरंजीच्या जयवंत महाविद्यालय इचलकरंजी येथे श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट यांच्या वतीने करिअर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.या कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य डॉ दिलावर जमादार यांच्या हस्ते झाले.यावेळी बोलताना ते म्हणाले की, नोकरी नाही असे म्हणून विषण्ण होण्याऐवजी आपल्याकडे असणारी कौशल्ये, अभ्यासातील सातत्य आणि सर्वात महत्वाचे म्हणजे चिकाटी ह्या गुणांची जोपासना ह्या उमेदवारीच्या काळात विद्यार्थ्यांनी करणे आवश्यक आहे.यावेळी वेगवेगळ्या सत्रात यू पी एस सी, एम पी एस सी, स्टाफ सिलेक्शन कमिशन,पोलिस भरती इत्यादी स्पर्धा परीक्षा आणि त्यात यशस्वी होण्यासाठी अभ्यासाचे नियोजन कसे करावे, ह्याबाबत प्रणव शेटे, उमेश सुतार, बिंदुसार इंगळे आदी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.स्वागत प्रास्ताविक डॉ. वसंत भागवत यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. राणगे यांनी केले तर आभार डॉ. मोहन जोशी यांनी मानले. या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.







