कोल्हापूरचे माजी जेष्ठ आमदार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, त्रिपुरा आणि बिहारचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे आज दुःखद निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील आणि संजय डी पाटील यांचे ते वडील होय.
महाराष्ट्र भारतासह जगभरात अनेक ठिकाणी डी वाय पाटील ग्रुप यांच्या वेगवेगळ्या शाखा असून शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे योगदान मोठे होते.
उद्या सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.








